पुस्तके का व कशासाठी वाचावे/Why and why not read a book b

पुस्तके का व कशासाठी वाचावे


१)जसे गाडी पेट्रोल, मोबाईल चार्जिंग,मनुष्य अन्न/पाणी/हवे शिवाय चालत नाही त्याच प्रकारे माझा मेंदू वाचनाशिवाय चालत नाही यामुळे मेंदूला चालना देण्यासाठी मी वाचत असतो..


२)वेगवेगळ्या लेखकांचे भिन्न भिन्न विषय/मुद्द्यांवर त्यांचे अनुभव/विचार जाणून घेऊन स्वतःच एक मत बनवण्यासाठी मी वाचत असतो.


३)एका जागी बसूनच जग फिरण्यासाठी मी वाचत असतो,


४)मनातील/मेंदूतील घाण विचार बाहेर पडून चांगले विचार मेंदूत घर करून बसावे यासाठी मी वाचत असतो,


५)जगात/देशात वाढत चाललेल्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी मी वाचत असतो.


६)जगात जेवढे यशस्वी व्यक्ती आहेत ते एक चांगले वाचक आहे यामुळे मी वाचत असतो.


७)वाचनाने काहीही नुकसान होत नाही यामुळे मी वाचत असतो किंवा तणावातून मुक्त होण्यासाठी मी वाचत असतो.


८)इतरांच्या अनुभवातून/चुकांतून शिकण्यासाठी मी वाचत असतो … वाचनाचे फायदे काय किंवा पुस्तक वाचन केल्यानंतर.....


१)प्रेम आणि वासना यामधील फरक समजतो..


२)गरीब सुद्धा श्रीमंत दिसु लागतो..


३)समाजामध्ये किती दुःख आहे हे समजते..


४)कोणत्या माणसांशी कसे वागावे हे समजू लागते..


५)प्राण्यांशी व निसर्गाशी आपुलकी निर्माण होते..


६)समाजातील भयानक रितीरिवाज,अंधश्रद्धा,रुढीपरंपरा, ढोंग समजू लागते..


७)महापुरुष नेमके कोणास म्हणावे हे समजते..


८)पैसा हाच सर्व नाही या गोष्टीवर आपला विश्वास बसतो..


९)विश्वात आपले अस्तित्व किती किरकोळ आहे हे समजते..


१०)आई वडिलांची खरी किंमत कळते..


११)कोणी आपल्याला कितीही वाईट बोलू द्या आपण त्याला नेहमी प्रेमानेच बोलावे हे समजून चुकते..


१२)आपल्या देशासाठी किती थोरांनी आपल्या प्राणाची बाजी लावली आहे हे समजते..


१३)किती इतिहासातील गोष्टी आपल्या पासून लपवल्या गेल्या आहे हे समजते..


१४)प्रत्येक महिलांची नेहमी इज्जत करावी हे समजते..


१५)आयुष्यात पास होणे फक्त हेच जीवनाचे उद्देश्य नाही.. किंवा एकाद्या परीक्षेत नापास झाल्यावर आत्महत्येचा विचार सुद्धा मनात येत नाही..


१६)आज जी व्यक्ती आपल्याला उच्च शिखरावर दिसते त्यांनी त्या शिखरावर पोहचण्यासाठी किती मेहनत केली होती हे समजते..


१७)विश्व किती अफाट आहे याची जाणीव होते..


१८)धर्म,जाती हे सर्व ढोंग असून माणुसकी हीच सर्वोपरी आहे याची समज येते..


१९)गौतम बुद्धांनी सांगितलेला "अत दीप भव" हा मार्ग समजतो..हजरत मुहम्मद पैगंबर यांचा खरा शांतीचा मार्ग देणारा इस्लाम समजतो..


२०)माणसांनी निसर्गाचा कशाप्रकारे विनाश केला आहे हे समजते..


२१)गुन्हेगारा मध्ये सुद्धा माणूस दिसू लागते व त्याची मजबुरी समजू लागते..


२२)कोणालाही उपदेश देण्याच्या पहिले आपण काय आहोत हे समजायला लागते..


२३)शिवरायांच्या स्वप्नातला हिंदवी स्वराज्य म्हणजे नेमकं काय हे समजते..


२४)बाबासाहेबांनी सांगितलेला मूलमंत्र शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा'याचा अर्थ कळतो..


२५)डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम सरांच्या स्वप्नातील भारत म्हणजे काय हे समजते..


२६)शहीद भगत सिंह यांच्या क्रांतीचा अर्थ कळतो..


२७)मंदिर-मस्जिद या गोष्टी मानवासाठी एवढ्या उपयोगाच्या नसून हॉस्पिटल,शाळा इत्यादीच मानवाच्या मूलभूत गरजा आहे हे समजते..


२८)कोणाकडून चुकी झाली असल्यावर त्याला माफ करण्याची समज येते..


२९)देशभक्तीचा नेमका अर्थ काय हे समजतो..


३०)विश्वाला,समाजाला बघण्याची एक नवीन दृष्टी मिळते..


३१)हिंदू मुस्लिम म्हणून न जगता माणूस म्हणून कसे जगावे समजते..


३२)समाजात तेढ निर्माण करणाऱ्या नेत्यांचा असली चेहरा समजतो..


३३)शेतकऱ्यांचे ,कामगारांचे दुःख समजते


३४)बालविवाह,लहान मुलांचे लैंगिक शोषण,कुपोषण,बलात्कार,बंधुवा मजदूरी इत्यादी आपल्या समाजाला लागलेली कीड आहे हे समजते...


३५)पुस्तक वाचनाचे फायदे कळू लागतात..


३६)आत्मविश्वास निर्माण होतो.


३७)विश्वाला/समाजाला बघण्याचा दृष्टिकोन बदलतो..


अशाच प्रकारच्या पुस्तकाविषयी माहितीसाठी नोटिफिकेशन ऑन कराटिप्पण्या