शेअर मार्केट समजून घ्या सोप्या व मराठी भाषेत

काय आहे शेअर मार्केट

 आपल्याकडील जवळ जवळ ७०-८०% लोक जेव्हा गुंतवणुकीचा विचार करतात तेव्हा सर्वात आधी गुंतवणुकीचे काही ठराविक पर्याय त्यांच्या समोर येतात उदा . जमीन खरेदी करणे , फ्लॅट्स खरेदी करणे , मग सोने खरेदी करणे , त्यानंतर बँक एफ-डी , पोस्ट इत्यादी.. पण शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार सहसा कोणी करतच नाही शेअर मार्केट मध्ये खूप चांगला परतावा मिळण्याची शक्यता असताना सुद्धा आजही लोकांना त्यावर खुपसा विश्वास नाही .. शेअर मार्केट मध्ये धोका आहे का ? असा प्रश्न जर तुमच्या मनात असेल तर त्याचे उत्तर नक्कीच "हो" असेच आहे .. पण हा धोका फक्त त्या लोकांसाठी आहे जे लोक अभ्यास न करता इतरांच्या विश्वसावर पैसे लावण्याचा प्रयत्न करतात. शेअर मार्केट बद्दल अजूनही समाजात बरेचसे अज्ञान असलेले दिसून येते आणि त्यामुळे आपली तरुण पिढी त्याकडे वळताना दिसत नाही रिस्क घेण्याची तयारी कोणामध्ये नाही कारण विश्वास नाही आणि विश्वास का नाही कारण अभ्यास नाहीजगातील किंवा भारतातील कोणतीही श्रीमंत लोकांची यादी पहा प्रत्येक व्यक्ती शेअर मार्केट मध्ये असलेली दिसून येते आणि ते आज-काल पासून नाही तर बऱ्याच वर्षांपासून तिथे असतात .. त्यांच्या इतर व्यवसायांसोबत त्यांची हि शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक असते .. आपला स्वतःवर विश्वास नसेल कदाचित पण ज्या लोकांनी त्यांच्या आयुष्यात आणि समाजात स्वकर्तुत्वाने स्वतःचे मोठे अस्तित्व निर्माण केले त्या लोकांवर तर आपण विश्वास ठेऊ शकतो ना ? वॉरेन बफेट , राधाकिशन दमाणी ,


Porinju Veliyath अशी बरीच उदाहरणे आपल्या समोर आहेत . या लोकांना एकाच दिवसात यश नाही मिळाले.. याची माहिती वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल कि ,कशाप्रकारे संपूर्ण अभयास करून योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्यामुळे त्यांना यश मिळाले आहे.शेअर मार्केट मधील गुंतवणूक रिस्की असली तरी योग्य ज्ञान मिळवून जर तुम्ही त्यात प्रवेश केलात तर तुम्ही तुमचे आर्थिक यश खूप लवकर मिळवू शकता , गरज आहे ती फक्त योग्य मार्गदर्शन घेण्याची आणि योग्य अभ्यास करण्याची ..

तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा

डिमॅट अकाउंट कसे खोलायचे बघूया पुढच्या ब्लोगर मध्ये

टिप्पण्या